TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

 TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

येथे टच केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.


ओपन झालेल्या विंडोमध्ये इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडा.

  

  आपण टेट साठी अर्ज भरल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतरच्या बॉक्समध्ये टाईप करा.रजिस्टर नंबर सोबतच आपल्याला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज वर आलेला पासवर्ड टाका किंवा पासवर्ड नसेल तर जन्मतारीख दिलेल्या फॉरमॅटमध्ये टाका.सर्वात शेवटी च्या बॉक्स मध्ये त्यावर दिसणाऱ्या text किंवा नंबर अचूक टाईप करा. त्याखाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लॉगिन बटन वर क्लिक करा. आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आपल्याला आपले हॉल तिकीट आपल्या मोबाईलवर देखील दिसून येईल त्या सदर हॉल तिकीट आपण मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट देखील


इ.10 वी 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद....

 

इ.10 वी 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद....

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद.... 



या संदर्भात शिक्षण मंडळाकडून एक परिपत्रक निर्गमित केले आहे...त्या विषयी सविस्तर माहिती पुढे पहाणार आहोत... यापूर्वी इ. 10 वी व 12 वी ची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्याना प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्या पूर्वी, विध्यार्थ्याना प्रश्नपत्रिका पूर्णपणे समजावी तिचे चांगल्याप्रकारे आकलन व्हावे यासाठी प्रश्नपत्रिका 10 मिनिटे लवकर देण्यात येत होती.

    म्हणजेच यापूर्वी आपल्याला सकाळ-सत्रामध्ये सकाळी 10:30 आणि पूर्वी एक्झाम हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे, त्याच प्रकारे दुपार सत्रा मध्ये दुपारी दोन वाजून 30 मिनिटांपूर्वी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक होते

     त्यानुसार सकाळसत्रा मध्ये आपल्याला 10 : 50 मिनिटांनाच प्रश्नपत्रिका देण्यात येत होती त्याचा हेतू म्हणजे प्रश्नपत्रिकेचे आकलन विद्यार्थ्यांना पूर्णपणे व्हावे. त्यानंतर सकाळ-सत्रामध्ये अकरा वाजता व दुपार सत्रामध्ये तीन वाजता आपण प्रत्यक्ष पेपर लिहिण्यास सुरुवात करत होतो...

    परंतु या सर्व गोष्टीचा काहीजण दुरुपयोग करत होते म्हणजेच प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही प्रमाणामध्ये अशा घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे.

    इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारीत वेळेनंतर पोहोचणा-या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

    अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदरप्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.

    सर्व परीक्षायांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत परीक्षाथ्यांना देण्यात आलेल्या आहेत.


NMMS EXAM निकाल जाहीर*



*NMMS EXAM निकाल जाहीर*

२१ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेचा निकाल आज परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला. आपला निकाल आपण खालील ठिकाणी भेट देऊन पाहू शकता.