महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*

 *महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*


प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,


शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.


यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी  https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नावनोंदणी करावी. 


नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.


प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. 


-


0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.