राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे अधिकृत चॅनल आता Jio Chat वर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे अधिकृत चॅनल आता Jio Chat वर


राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राचार्य/ मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक , शिक्षण प्रेमी, विषय साधन व्यक्ती, मोबाईल टीचर, यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रसारित करण्यात येणारी अभ्यासमाला, विविध प्रशिक्षणे यांची माहिती, संदर्भ साहित्य, शासन निर्णय, ई साहित्य, अवांतर वाचनाची पुस्तके अथवा शिक्षकांसाठी/ शाळांसाठी वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती तत्काळ एका क्लिकवर मिळवायची असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.

यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.

https://jiochat.com/channel/600000000955/1 


0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.