:- इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यानी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत

विषय :- इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यानी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत ..

माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या जीवनातील एका महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होत असते. अशा टप्प्यावर विद्यार्थ्याने पुढील कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत अनेकदा संभ्रम अवस्था असते याचवेळी विद्यार्थ्याला करिअर विषयक मार्गदर्शनाची खरी गरज असते. विद्यार्थी बऱ्याचवेळा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई वडिलांच्या, मित्रांच्या सांगण्यावरून करिअर ची निवड करतो आणि भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला अनेक अडचणी निर्माण होतात.
यामुळे विद्यार्थ्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच्या टप्प्यावर करिअर ची निवड करताना त्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, त्याला अनुरूप असे कोणते अभ्यासक्रम देशपातळीवर उपलब्ध आहेत आणि त्यातील कोणता अभ्यासक्रम उपयुक्त आहे याची अचूक माहिती मिळणे आवश्यक असते. याचसोबत सदर अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्त्या, सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर व्यावसायिक व नौकरीच्या संधी याची माहिती मिळणे गरजेचे आहे.

यामुळे इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम  व व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती, शिष्यवृत्या, प्रवेश परीक्षा, याबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने युनिसेफ च्या सहाय्याने महाकरिअर पोर्टल तयार केले आहे.

या महाकरिअर पोर्टलचे मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या हस्ते दि.२२ मे २०२० रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.

सदर महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यास सुमारे ५५५ करिअर, सुमारे २१,००० महाविद्यालये/ संस्था, सुमारे ११५० विविध प्रवेश प्रक्रिया व १२०० विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्याना https://mahacareerportal.com  या वेबसाईटवर जाऊन आपला सरल आय.डी (शाळेने विद्यार्थ्यांना द्यावा) व पासवर्ड 123456  चा वापर करून महाकरिअर पोर्टलचा करिअर विषयक माहिती घेण्यासाठी उपयोग करता येणार आहे.

सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचा सरल आय.डी त्यांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थी महाकरिअर पोर्टल वर लॉगीन करून अभ्यासक्रमाची माहिती पाहू शकेल.

तरी सदर महाकरिअर पोर्टलची सुविधा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना, कनिष्ठ महाविद्यालये , विद्यार्थी व पालक यांच्या  निदर्शनास आणावी व विद्यार्थ्यांना महाकरिअर पोर्टलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे






0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.