राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण

कोरोना संक्रमणामुळे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी शाळा मात्र बंदच आहेत. या काळातही मुलांचे शिक्षण निरंतर चालू राहण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शाळा व शिक्षकांच्या संपर्कात रहावे यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत गुगल क्लासरूम ची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.
या उपक्रमांतर्गत SCERT प्रत्येक शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना मोफत G-Suite आय डी उपलब्ध करून देणार आहे.यामुळे शिक्षकांना एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिका घेता येणार आहे. शिक्षकांसाठी G-Suite आय डी हे अनलिमिटेड असणार आहेत. तर विद्यार्थ्यांना ठराविक कालमर्यादा असणारे आय डी व पासवर्ड देण्यात येणार आहेत.ज्याचा वापर करून गुगल क्लासरूम च्या माध्यमाने ऑनलाइन वर्ग अध्यापन सुरु ठेवले जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय शासकीय शाळा व महाविद्यालयातील सुमारे ४०००० शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असून हे प्रशिक्षण ३ तासांचे असणार आहे.

प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य : इंटरनेट जोडणीसह संगणक अथवा लॅपटॉप, अथवा दोन स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण नावनोंदणी : गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी खालील लिंक वरून नावनोंदणी करू शकता.


इच्छुक शिक्षकांनी सदर लिंक वर नावनोंदणी तात्काळ करावी. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया दि १३ जुलै रात्री ११.५५ वाजता बंद होणार आहे.

वरील सर्व सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या  दि.११ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. पत्र पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.