रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.

रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.




वार्षिक परीक्षा 2024 सुधारीत वेळापत्रक जाहीर ! या तारखेला परीक्षा सुरू होणार | SCERT पुणे

 वार्षिक परीक्षा 2024 सुधारीत वेळापत्रक जाहीर ! या तारखेला परीक्षा सुरू होणार | SCERT पुणे



 नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत


उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) - (संकलित मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत.


नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)


२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.


३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन - २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते.


परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन २ ही दिनांक ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.

संकलित मूल्यमापन - २ चे वेळापत्रक


संकलित मूल्यमापन चाचणी- १ (२०२३-२४ साठी) वेळापत्रक


इयत्ता निहाय परीक्षेचा वेळ (तीनही दिवसांसाठी)


प्रथम भाषा (सर्व माध्यम)


दिनांक ०४.०४.२०२४


१) तिसरी / चौथी स. ८.०० ते ९.३०


२) पाचवी / सहावी स. ८.०० ते ९.४५


३) सातवी / आठवी स. ८.०० ते १०.००


गणित (सर्व माध्यम)


दिनांक ०५.०४.२०२४


१) तिसरी / चौथी स. ८.०० ते ९.३०


२) पाचवी / सहावी स. ८.०० ते ९.४५


३) सातवी / आठवी स. ८.०० ते १०.००

इंग्रजी


दिनांक ०६.०४.२०२४


१) तिसरी / चौथी स. ८.०० ते ९.३०


२) पाचवी / सहावी स. ८.०० ते ९.४५


३) सातवी / आठवी स. ८.०० ते १०.००


३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.


४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.


५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

इयता पाचवी व आठवता वार्षिक परीक्षाः


२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.


४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.


५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन - २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT-३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे




TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

 TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

येथे टच केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.


ओपन झालेल्या विंडोमध्ये इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडा.

  

  आपण टेट साठी अर्ज भरल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतरच्या बॉक्समध्ये टाईप करा.रजिस्टर नंबर सोबतच आपल्याला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज वर आलेला पासवर्ड टाका किंवा पासवर्ड नसेल तर जन्मतारीख दिलेल्या फॉरमॅटमध्ये टाका.सर्वात शेवटी च्या बॉक्स मध्ये त्यावर दिसणाऱ्या text किंवा नंबर अचूक टाईप करा. त्याखाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लॉगिन बटन वर क्लिक करा. आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आपल्याला आपले हॉल तिकीट आपल्या मोबाईलवर देखील दिसून येईल त्या सदर हॉल तिकीट आपण मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट देखील


इ.10 वी 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद....

 

इ.10 वी 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद....

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद.... 



या संदर्भात शिक्षण मंडळाकडून एक परिपत्रक निर्गमित केले आहे...त्या विषयी सविस्तर माहिती पुढे पहाणार आहोत... यापूर्वी इ. 10 वी व 12 वी ची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्याना प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्या पूर्वी, विध्यार्थ्याना प्रश्नपत्रिका पूर्णपणे समजावी तिचे चांगल्याप्रकारे आकलन व्हावे यासाठी प्रश्नपत्रिका 10 मिनिटे लवकर देण्यात येत होती.

    म्हणजेच यापूर्वी आपल्याला सकाळ-सत्रामध्ये सकाळी 10:30 आणि पूर्वी एक्झाम हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे, त्याच प्रकारे दुपार सत्रा मध्ये दुपारी दोन वाजून 30 मिनिटांपूर्वी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक होते

     त्यानुसार सकाळसत्रा मध्ये आपल्याला 10 : 50 मिनिटांनाच प्रश्नपत्रिका देण्यात येत होती त्याचा हेतू म्हणजे प्रश्नपत्रिकेचे आकलन विद्यार्थ्यांना पूर्णपणे व्हावे. त्यानंतर सकाळ-सत्रामध्ये अकरा वाजता व दुपार सत्रामध्ये तीन वाजता आपण प्रत्यक्ष पेपर लिहिण्यास सुरुवात करत होतो...

    परंतु या सर्व गोष्टीचा काहीजण दुरुपयोग करत होते म्हणजेच प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही प्रमाणामध्ये अशा घटना घडल्याचे निदर्शनास आलेले आहे.

    इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारीत वेळेनंतर पोहोचणा-या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

    अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदरप्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.

    सर्व परीक्षायांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत परीक्षाथ्यांना देण्यात आलेल्या आहेत.


NMMS EXAM निकाल जाहीर*



*NMMS EXAM निकाल जाहीर*

२१ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेचा निकाल आज परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला. आपला निकाल आपण खालील ठिकाणी भेट देऊन पाहू शकता.

  




1 जुलै पासून सेतू अभ्यासक्रमास सुरुवात.सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.

 

1 जुलै पासून सेतू अभ्यासक्रमास सुरुवात*

                इ. 2री ते इ. 10वी* साठी सेतू अभ्यासक्रम *1 जुलै पासून सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम *14 ऑगस्ट पर्यंत 45 दिवसासाठी राबवायचा आहे.

            शिक्षकांनी 1 ते 45 कृती दिलेल्या नियोजनाप्रमाणे पूर्ण करुन घ्यावयाच्या आहेत.* शिक्षक व पालकांनी आपल्या *पाल्याला सर्व कृती व्यवस्थित येत आहेत* याची खात्री करावी. या 45 दिवसाच्या कालावधीत *तीन चाचण्या* घेतल्या जाणार आहेत.

                सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.

                     इयत्ता* - 2री ते 10वी

    



 शैक्षणिक दिनदर्शिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

 माहे डिसेंबर 2020 ते माहे एप्रिल 2021 पर्यंतच्या शैक्षणिक दिनदर्शिका*



इ.1 ली ते इ.10 वी मराठी माध्यम

इयत्ता १ ली [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता २ री [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ३ री [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ४ थी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक 
इयत्ता ५ वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ६ वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ७ वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ८ वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता ९ वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता १० वी [मराठी माध्यम]डाऊनलोड लिंक
इयत्ता १ ली ते १० वी [मराठी माध्यम] डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१डाऊनलोड लिंक